fbpx Skin Care Tips in Marathi: उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी?
Book Appointment

Skin Care Tips in Marathi: उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी?

Aug 14, 2022

Skin Care Tips in Marathi: उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी?

उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते कारण, ह्या ऋतुमधील कडक उन्हाचा आणि हवेतील कोरडेपणाचा त्वचेवर परिणाम होतो. तीव्र उन्हामुळे त्वचा लाल होते, काळी पडते, कोरडी होते आणि निस्तेज दिसू लागते. शरीरातील उष्णता वाढल्यामुळे अनेकांना घामुळे येणे, त्वचेवर पुरळ येणे ह्यांसारखे त्रास होतात, तर काहींना सनबर्नचा (sunburn) त्रास होतो ज्यामधे त्वचेवर काळे डाग पडतात, खाज येते, व सूज येते. बर्‍याच लोकांना उन्हाळ्यामध्ये मुरूमांचा (acne breakouts in summer) त्रास होतो. हे सगळे विकार टाळण्यासाठी व उन्हाळ्यातही त्वचेचा तजेला टिकवण्यासाठी, त्वचेची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. ह्या लेखात आपण बघणार आहोत, उन्हाळ्यात त्वचेही काळजी घेण्यासाठीचे घरगुती उपाय, मराठीतून (home remedies for summer skin care in marathi). 

Worried about your skin condition? Get in touch with best of our skin specialists in Pune. For a skin treatment, book an appointment with our dermatologists near you +919584584111

उन्हाळ्यात त्वचेची काळजी काशी घ्यावी? (Summer Skin Care Tips in Marathi)

उन्हापासून त्वचेचे संरक्षण करणे (sun protection for the skin) अतिशय महत्वाचे आहे. त्यासाठी, उन्हात बाहेर पडणार असाल तर  छत्री अथवा डोक्याचा रुमाल किंवा टोपीचा वापर करा. डोळ्यांभोवतीची त्वचा चेहर्‍याच्या इतर त्वचेच्या तुलनेत नाजुक असते, म्हणूनच उन्हात जाताना सन ग्लासेस घाला. तसेच सनस्क्रीनचा वापर करा.

उन्हाळ्यामध्ये खूप मेकअप वापरू नका, कारण त्वचेला श्वास घेऊ देणे महत्वाचे आहे. उन्हाळ्यामध्ये पावडर स्वरुपातील मेकअप उत्पादने वापरणे केंव्हाही चांगले. ह्या ऋतूमध्ये ओठ कोरडे पडतात. त्यांची काळजी घेण्यासाठी (lip care in summer) लिप बामचा वापर करा.

घाम आणि चिकटपणामुळे त्वचेची रंध्रे मोकळी राहत नाहीत. त्यांना मोकळे ठेवण्यासाठी काकडी किंवा आलोवेरा असलेला टोनर (aloe vera based toner) वापरा.

aloe vera

त्वचेवर अँटी ऑक्सिडेन्ट सीरमचा (antioxidant serum) वापर करा आणि रोजच्या खाण्यामध्ये अँटी ऑक्सिडण्ट युक्त पदार्थांचा समावेष करा.

उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या. घामावाटे शरीरातील पाणी निघून जाते, ज्यामुळे उन्हाळ्यामध्ये अधिक पाणी पिणे आवश्यक असते. रोजच्या आहारात फळे, फळांचा रस, सरबते ह्यांचा समावेष करा. असे केल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहील आणि त्वचेच्या विकारांनाही आळा बसण्यास मदत होईल.

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठीचे (skin care in summer) अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे कमी गरम पाण्याने अंघोळ करणे. खूप गरम पाणी घेतल्यास त्वचा कोरडी पडते आणि त्वचेचे इतर काही त्रासही होऊ शकतात.

उन्हाळ्यात सूती कपड्यांचा वापर करा, जेणेकरून घामुळे, पुरळ व इतर उष्णतेच्या विकारांना दूर ठेवता येईल.

तुमची त्वचा जर कोरडी असेल, तर क्रीम्सचा वापर करा. जर तुमची त्वचा तेलकट असेल, तर वॉटर-बेस्ड मेकअप उत्पादने वापरा.

अनेक वेळा उन्हाळ्यात डोळ्यांची तसेच त्वचेचीही आग किंवा जळजळ होते. तसे होत असल्यास, डोळ्यांवर आणि त्वचेच्या त्या भागावर  थंड पाण्याच्या पट्ट्या किंवा काकडीचे तुकडे ठेवा. असे केल्याने आग किंवा जळजळ होणे तर थांबतेच पण शरीरातील उष्णताही कमी होते.

चंदन, आमसूल, ताक/दही ह्यांसारखे पदार्थ त्वचेवर लावल्याने शरीरातील उष्णता कमी होते आणि उष्णतेमुळे होणारे त्वचेचे विकारही होत नाहीत.

त्वचेवर पुरळ किंवा घामुळे आले असल्यास अथवा उन्हामुळे त्वचेची आग होत असल्यास चंदनाचा लेप लावा, कढीलिंबाचा लेप लावा, किंवा ताक, दही अशा थंड पदार्थांचा वापर करा. ह्यामुळे त्वचेला थंड आणि शांत वाटेल व उन्हाळ्यात होणारे त्वचेचे इतर त्रासही (skin problems in summer) कमी होतील.

थोडक्यात सांगायचे झाले तर उन्हाळ्यामधे त्वचेची रंध्रे मोकळी ठेवली पाहिजेत (prevent skin pores from clogging), त्वचेतील ओलावा टिकवून ठेवला पाहिजे (keep the skin hydrated) आणि शरीरातील उष्णता वाढू नये ह्यासाठी भरपूर पाणी तसेच इतर थंड पदार्थ ह्यांचा दैनंदिन आहारात समावेष करणे खूप महत्वाचे आहे. आशा प्रकारे त्वचेची योग्य काळजी घेतलीत तर उन्हाळ्यातही तुमाचा चेहरा तजेलदार आणि टवटवीत दिसू शकेल आणि त्वचेचे उन्हाळ्यात उद्भवणारे आजार तुम्हाला होणार नाहीत.

For treating your skin condition, feel free to get in touch with one of our best dermatologists in Pune. You can also call on +919584584111 to book an appointment at one of our skin clinics near you.

Share:

Dr Dhanraj Chavan

About the Author: Dr Dhanraj Chavan

Dr. Dhanraj Chavan is a globally trained, young, and dynamic dermatologist. He is a Consultant Dermatologist and Varicose Vein Specialist at Clear Skin, VeinMD, and HairMD.

Previous Post

event-img

7 Tips to Brighten Dull Skin Naturally

Blog, Skin Care|Dr Dhanraj Chavan|
August 14, 2022

As pollution, sun exposure, and aging take their toll, ‘my skin looks dull and tired’ has become a common refrain among those young and old. There is no denying that... 28416

Next Post

event-img

पिंपल्स येण्याची कारणे व उपाय मराठीमध्ये

Blog, Skin Care|Dr Dhanraj Chavan|
August 14, 2022

पिंपल्स ही अनेकांमध्ये आढळणारी त्वचेची समस्या आहे. पिंपल्स कोणत्याही वयात होऊ शकतात, पण ह्या समस्येचे प्रमाण युवकांमध्ये आधिक असते. पिंपल्स ना तारुण्यपिटिका असेही संबोधले जाते. हा वेदनाकरक किंवा संसर्गजन्य आजार...

Leave a Comment

Your email id will not be published.Required fields are marked*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *