पिंपल्स येण्याची कारणे व उपाय मराठीमध्ये
Book Appointment

पिंपल्स येण्याची कारणे व उपाय मराठीमध्ये

Aug 19, 2022

पिंपल्स येण्याची कारणे व उपाय मराठीमध्ये | पिंपल्स वरील घरगुती उपाय

पिंपल्स ही अनेकांमध्ये आढळणारी त्वचेची समस्या आहे. पिंपल्स कोणत्याही वयात होऊ शकतात, पण ह्या समस्येचे प्रमाण युवकांमध्ये आधिक असते. पिंपल्स ना तारुण्यपिटिका असेही संबोधले जाते. हा वेदनाकरक किंवा संसर्गजन्य आजार नाही परंतू पिंपल्सचा आत्मविश्वासावर विपरीत परिणाम होतो. पिंपल्स येतात तेंव्हा त्वचेवर, विशेषत: चेहर्‍यावर लाल रंगाचे फोड, पिटिका किंवा पुरळ उठते. काहीवेळा त्या जागी आग होणे, खाज येणे असे त्रासही होऊ शकतात व पिंपल्स गेल्यानंतर, त्या जागेवर काळे डाग दिसतात. त्यामुळे, पिंपल्स असताना चे लाल फोड व पिंपल्स गेल्यावर, त्यांच्या जागेवर पडलेले काळे डाग त्वचेच्या सौंदर्‍यात बाधा आणतात, व त्यामुळे आत्मविश्वास कमी होतो, लोकांमध्ये मिसळण्याची लाज वाटते व ह्या सगळ्याचा रोजच्या आयुष्यावर परिणाम होतो. पिंपल्स नेमकी कशामुळे येतात व त्यावरील सर्वात परिणामकारक उपचार कोणते? ह्या लेखात आपण जाणून घेणार आहोत, पिम्पल्स येण्याची कारणे व उपाय मराठीमध्ये.  

Worried about your skin condition? Get in touch with best of our skin specialists in Pune. For a skin treatment, book an appointment with our dermatologists near you +919584584111

Table of Contents

पिम्पल्स येण्याची कारणे (Pimples Ka Yetaat: Explained in Marathi) 

पिंपल्स वरील उपाय (Pimple Removal Tips in Marathi)

पिम्पल्स येण्याची कारणे (Pimples Ka Yetaat: Explained in Marathi) 

  • त्वचेतील तेलग्रंथी जेंव्हा आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात तेल निर्माण करतात, तेंव्हा त्वचा तेलकट होते ज्यामुळे पिंपल्स येतात.
  • जेंव्हा केसांच्या बीजकोशांमध्ये तेल व त्वचेच्या मृत पेशी जमा होतात, तेव्हा पिंपल्स येतात.
  • त्वचेची निगा राखली गेली नाही, तर पिंपल्स येऊ शकतात. तसेच, अस्वच्छतेमुळे पिंपल्स येतात.
  • हार्मोन्स च्या असंतुलनामुळे पिंपल्स येऊ शकतात.
  • जीवाणू हे देखील पिंपल्स येण्याचे एक प्रमुख कारण आहे.
  • काही सौंदर्य प्रसाधनांच्या वापरामुळे ही पिंपल्स येऊ शकतात.
  • हवेतील प्रदूषण हे देखील पिंपल्स चे एक कारण आहे.
  • काही औषधांमध्ये corticosteroids, lithium किंवा testosterone सारखे घटक असतात. अशा औषधांच्या सेवनामुळेही पिंपल्स होऊ शकतात.
  • मानसिक ताण-तणावामूळे पिंपल्स येतात. 
  • कार्बोदके असलेल्या खाद्य पदार्थांच्या अति सेवनामुळेही पिंपल्स येऊ शकतात.

पिंपल्स वरील उपाय (Pimple Removal Tips in Marathi)

  • विशिष्ठ जेल्स किंवा क्रीम्स त्वचेवर लावल्याने पिंपल्स चे प्रमाण कमी करता येते.
  • Retinoids व antibiotics त्वचा रोग तज्ञांच्या सल्ल्याने घेतल्यास पिंपल्स दूर करण्यामध्ये चांगली मदत होते.
  • त्वचा स्वछ ठेवणे, दिवसातून 2 वेळा पाण्याने धुणे, व त्वचेला जास्त तेलकट होण्यापासून रोकल्यास पिंपल्स कमी होतात.
  • एलोवेरा व लसूण ह्यांचे मिश्रण त्वचेवर लावल्यास पिंपल्स जातात.

aloe vera

  • पिकलेले केळे त्वचेवर चोळणे हा देखील पिंपल्स वरील एक रामबाण उपाय आहे.
  • दालचीनी व मध एकत्र करून त्यांचा लेप त्वचेला लावणे हा पण पिंपल्स वरचा एक चांगला उपाय आहे.
  • त्वचेवर बेकिंग सोडा लावल्याने पिंपल्स घालवण्यास मदत होते.
  • हे झाले पिंपल्स घालवण्यासाठीचे काही घरगुती उपाय, पण हे उपाय करूनही तुमचे पिंपल्स जात नसतील, किंवा त्वचेचा हा त्रास तुम्हाला पुन्हा पुन्हा उद्भवत असेल, तर वैद्यकीय सल्ला घेणे उत्तमच.
  • केमिकल पील हा पिंपल्स वरील एक चांगला वैद्यकीय उपचार आहे, ज्यामधे त्वचेचा वरील स्थर काढला जातो. ह्याचा पिंपल्स घालवण्यासाठी चांगला उपयोग होतो.

Chemical Peel

  • डर्मअब्रेजन ह्या उपचार्पद्धतीमद्धे त्वचेवरील वरचा स्तर काढला जातो, ज्याचा उपयोग पिंपल्स घालावण्यामधे होतो.
  • कोर्टिसोन इंजेक्शन घेणे हा देखील पिंपल्स वरील एक चांगला उपाय आहे.
  • लाइट थेरपी व लेसर थेरपी हेही पिंपल्स वरील उत्तम उपाय आहेत, ज्यायोगे, त्वचेमधील तेलाचे प्रमाण कमी केले जाते व जंतूंचा प्रादुर्भाव रोकला जातो.
  • चांगला आहार घेणे, योग्य तो व्यायाम करणे, व मानसिक तणाव कमी करणे, तसेच त्वचेची निगा राखणे, व तिला उन्हापासून व प्रदूषणापासून सुरक्षित ठेवणे, ह्या गोष्टी पिंपल्स होऊ नं देण्यासाठी महत्वाच्या आहेत.

इथे नमूद केलेले वैद्यकीय उपचार तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली घेणेच योग्य आहे. तुम्ही जर पिंपल्स मुळे त्रस्त असाल आणि एखाद्या उत्तम त्वचारोग तज्ञा च्या शोधात असाल तर ClearSkin ह्या पुण्यातील skin clinic ला एकदा आवश्य भेट द्या. तेथील अनुभवी doctors तुम्हाला उत्तम मार्गदर्शन करतील व तुमची पिंपल्स ची समस्या दूर करण्यासाठी तुमच्यावर योग्य ते उपचार करतील.

For treating your skin condition, feel free to get in touch with one of our best dermatologists in Pune. You can also call on +919584584111 to book an appointment at one of our skin clinics near you.

Share:

Dr Dhanraj Chavan

About the Author: Dr Dhanraj Chavan

Dr. Dhanraj Chavan is a globally trained, young, and dynamic dermatologist. He is a Consultant Dermatologist and Varicose Vein Specialist at Clear Skin, VeinMD, and HairMD.

Previous Post

event-img

Skin Care Tips in Marathi: उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी?

Acne Pimple, Blog|Dr Dhanraj Chavan|
August 19, 2022

उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते कारण, ह्या ऋतुमधील कडक उन्हाचा आणि हवेतील कोरडेपणाचा त्वचेवर परिणाम होतो. तीव्र उन्हामुळे त्वचा लाल होते, काळी पडते, कोरडी होते आणि निस्तेज दिसू लागते.... 29452

Next Post

event-img

Causes of Itchy Skin and How to Treat it?

Acne Pimple, Blog|Dr Dhanraj Chavan|
August 19, 2022

A constantly itching skin could irritate you and people looking at you while interacting with you. For many, it could refer to poor skin hygiene. But that is only one...

Leave a Comment

Your email id will not be published.Required fields are marked*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *