मेलास्मा (Melasma) ज्याला क्लोआस्मा (Chloasma) असेही म्हणतात, त्याला मराठीमधे वांग असे संबोधले जाते. वांगाचे डाग ही त्वचेची एक साधारण समस्या आहे जी अनेक लोकांमध्ये आढळते, पण स्त्रीयांमध्ये मेलास्मा होण्याचे प्रमाण आधिक असते, विशेषत: गरोदरपणात हा त्रास होतो. मेलास्मा चे अजून एक प्रमुख कारण म्हणजे हार्मोन्सचे असंतुलन, तसेच, त्वचेला तीव्र उन्हाच्या झळा लागल्यानेही हा आजार उद्भवू शकतो. मेलास्मा मध्ये त्वचेवर तपकिरी रंगाचे डाग (brown spots or patches on the skin) पडतात. चेहर्यावर, विशेषकरून कपाळ, गाल, नाक आणि हनुवटीवर हे डाग आढळून येतात, ज्याला वांगाचे डाग असे म्हणतात. ह्या लेखामद्धे आपण मेलास्मा होण्याची कारणे, ह्या आजाराची लक्षणे आणि त्यावरील घरगुती उपाय तसेच औषधोपचार ह्यांविषयी जाणून घेणार आहोत.
त्वचेच्या रंगात बदल होणे (skin discolouration) हे मेलास्माचे प्रमुख लक्षण आहे. त्वचेवर वांगाचे डाग दिसून येतात, जे प्रामुख्याने चेहर्यावर पडतात आणि मुख्य म्हणजे हे डाग सममितीय असतात, म्हणजेच, दोन्ही गालांवर अथवा कपाळाच्या दोन्ही बाजूंवर हे डाग दिसून येतात. शरीराच्या इतर भागांवरही वांगाचे डाग पडू शकतात. बर्याच लोकांमध्ये हे डाग मानेवर आणि हातावरही दिसून येतात. ह्या डगांचा कोणताही शारीरिक त्रास होत नाही, जसेकी दुखणे, आग, जळजळ अशी कोणतीही लक्षणे ह्या आजारात जाणवत नाहीत. परंतू, ज्यांना मेलास्मा होतो, त्यांना ह्या डागांची लाज वाटते, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि अशा वेळी हे लोक मेलास्मावरील उपाय शोधू लागतात.
ह्या उपायाममुळे वांग कायमस्वरूपी जातो असे नाही. हे उपचार घेऊनही कालांतराने मेलास्मा पुन्हा उद्भवू शकतो. हे टाळण्यासाठी, उपचार घेतल्यानंतरही, त्वचेला उन्हापासून सुरक्षित ठेवणे आवश्यक ठरते. वांगाचे डाग कमी करण्यासाठी तसेच त्वचेचा रंग आणि तकाकी सांभाळण्यासाठी त्वचेही नीट काळजी घेणे आवश्याक ठरते. चेहरा, मान आणि हात वेळोवेळी स्वच्छ धुणे, त्वचेला उन्हापासून संरक्षण देणे, सर्व जीवनसत्वांनी युक्त असा आहार घेणे, आणि हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी योग्य तो व्यायाम करणे महत्वाचे आहे.
तुम्हाला जर मेलास्माची कोणतीही लक्षणे जाणवत असतील किंवा तुमच्या चेहर्यावरचे डाग वांगाचे आहेत असे तुम्हाला वाटत असेल, तरी कोणताही निष्कर्ष काढण्या आधी त्वचारोग तज्ञाचा सल्ला घ्या (consult a dermatologist) आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती उपचारपद्धती सुरू करा. एखादी तज्ञ व्याक्तीच तुमच्या आजाराचे निदान करू शकेल आणि त्याप्रमाणे तुम्हाला योग्य ते उपचार देऊ शकेल.
तुम्ही जर मेलास्मा वर कायमस्वरूपी उपाय शोधत असाल, तर ClearSkin मधील तज्ञांचे मार्गदर्शन घ्या. ते तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतील, तुमच्या आजाराचे योग्य प्रकारे निदान करतील आणि तुम्हाला लागू पडतील असे उपचार करतील. येथे उपचार घेतल्यानंतर तुमचे वांगाचे डाग तर जातीलंच पण तुमच्या त्वचेमधे चांगले बदलही दिसून येतील आणि तुमचे सौंदर्य अधिक खुलून येईल.
Blog, Melasma|Dhananjay Chavan|
May 14, 2022
Who doesn’t love to look young? Everyone does. But advancing age affects facial features, and causes fine lines and wrinkles to appear on the face. Fortunately, advancements in skin treatments... 17626
Blog, Melasma|Dhananjay Chavan|
May 14, 2022
Acne Vulgaris (or simply acne) is a skin condition in which the hair follicles are clogged by dead skin cells and oils. Those with acne commonly have blackheads, whiteheads, and...
Leave a Comment
Your email id will not be published.Required fields are marked*