कोड रोग (Vitiligo): लक्षणे, कारणे व उपचार
Reviewed By: Dr. Manali Shah
Updated on: 05th November, 2021

कोड रोग, म्हणजेच vitiligo मध्ये त्वचेचा रंग जातो, ज्यामुळे, त्वचेवर पांढरे डाग दिसतात किंवा त्वचा पूर्णपणे पांढरी होते. ज्या पेशी त्वचेला रंग असण्यास कारणीभूत असतात, त्या गेल्यामुळे किंवा त्यांचे कार्य थांबल्यामुळे, कोड रोग उद्भवतो.
कोड रोगामद्धे, त्वचेवरील पांढरे डाग आकाराने मोठे होत जातात. Melanin च्या कमतरेतेमुळे Vitiligo होतो. हा रोग असणार्यांचा आत्मविश्वास कमी होतो, व त्यांना लोकांमध्ये मिसळण्यास नको वाटू शकते, व ह्याचा त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो. प्रामुख्याने ह्याच कारणाने, vitiligo असणारे लोक, ह्या रोगावरील उपचार शोधतात. ह्या लेखामद्धे आपण पाहणार आहोत, कोडाची कारणे, कोड ह्या त्वचा रोगाची लक्षणे व ह्या त्वचारोगावरील उपचार.
Table Of Content
- कोड रोग कशामुळे होतो (Causes of Vitiligo)
- पांढरे डाग येण्याचे कारण (Reasons for White Spots on Skin)
- कोड रोग संसर्गजन्य आहे का? (Is Vitiligo Contagious?)
- कोड रोग उपचार (Treatment for Vitiligo)
- Conclusion
कोड रोग कशामुळे होतो (Causes of Vitiligo)
Melanin ह्या pigment मुळे त्वचेला रंग असतो. Melanocytes नावाच्या पेशी melanin तयार करतात. ह्या पेशींच्या कमतरतेमुळे त्वचेचा रंग जातो किंवा पांढरा होतो. Vitiligo चे नेमके कारण ज्ञात नाही पण असे आढळून आले आहे की कोड ही एक autoimmune condition आहे. अनेकदा असे दिसून येते की ज्या व्यक्तीला कोड आहे, त्याचा एखादा नातेवाईकही ह्याच रोगाने त्रस्त असतो, म्हणजेच असे म्हणता येईल की कोड रोग अनुवंशिक असावा, म्हणजे एखाद्या व्यक्तीला हा रोग असेल, तर तिच्या कुटुंबातील इतर कोणालाही हाच रोग असण्याची शक्यता असते. ज्या लोकांची त्वचा गडद रंगाची आहे, त्यांना कोड रोग असण्याची जास्त संभावना असते.
पांढरे डाग येण्याचे कारण (Reasons for
White Spots on Skin)
वर नमूद केल्याप्रमाणे, melanocytes च्या कमतरतेमुळे त्वचेचा रंग जातो, म्हणजेच त्वचा पांढरी दिसू लागते. हयाचाच अर्थ असा की कोड रोगा मध्ये, त्वचेचे काही भाग पांढरे दिसतात, म्हणजेच, त्वचेवर पांढरे डाग पडतात.
All About Vitiligo/Leucoderma (सफ़ेद दाग प्रकार, कारण और उपाय) | Clear Skin, Pune
कोड रोग संसर्गजन्य आहे का? (Is Vitiligo Contagious?)
कोड रोग अनुवंशिक किंवा जनुकीय कारणांनी होतो. वातावरणातील काही घटकांमुळे देखील कोड रोग उद्भवू शकतो किवा वाढू शकतो. परंतू कोडरोग संसर्गजन्य नाही.
कोड रोग उपचार (Treatment for Vitiligo)
- त्वचेवर corticosteroids लावल्याने, त्वचेचा रंग सुधारू शकतो.
- रोग प्रतिकारक शक्ती वर परिणाम करणारी औषधे देखील कोड रोगावर परिणामकारक ठरतात.
- Light therapy, ज्यामधे त्वचेवर UVB किरणांचा वापर केला जातो, हा देखील कोड रोगावरचा एक उत्तम उपाय आहे. साधारण 6 महिन्यांमध्ये, ह्या उपचार पाद्धेतीचा चांगला परिणाम दिसू शकतो, म्हणजेच, त्वचेवरील पांढरे डाग कमी होऊन, त्वचेचा रंग पूर्ववत होऊ लागतो.
- Depigmenting agent चा वापर करून, Vitiligo मुळे पांढरे नं झालेले त्वचेचे भाग पांढरट/फिकट केले जातात, ज्यामुळे संपूर्ण त्वचेचा रंग कोडामुळे बदललेल्या त्वचेसारखा दिसू लागतो.
- Skin ग्राफटिंग ह्या प्रक्रियेमधे, कोडाने बाधित त्वचेमध्ये, निरोगी त्वचेच्या काही भागाचे रोपण केले जाते.
- Blister ग्राफटिंग ह्या प्रक्रियेमधे, निरोगी त्वचेवर blisters केले जातात, आणि कोडाने बाधित त्वचेच्या भागांमध्ये ह्या blisters च्या वरच्या भागाचे रोपण केले जाते.
- सेल्यूलर सस्पेंशन ट्रन्स्प्लांट (Cellular Suspension Transplant) ह्या वैद्यकीय प्रक्रियेमधे, निरोगी त्वचेतील टिशू घेतले जातात व त्यातील पेशींना एका द्रव्यामद्धे ठेवले जाते, ज्यानंतर, कोडाचे डाग असलेल्या त्वचेवरील भागांमध्ये त्यांचे रोपण करतात. ह्या उपचार्पद्धतीचे परिणाम साधारण 4 आठवड्यामध्ये दिसू लागतात.
Do You Know?
Roughly 250 Patients Are Treated
Everyday By These Dermatologists
(You are one click away from flawless skin)
Meet Our Dermatologist!
Conclusion
तर अशा रीतीने, ह्या लेखामद्धे आपण आढावा घेतला, कोड रोगाची कारणे (reasons behind vitiligo), लक्षणे (vitiligo symptoms) आणि उपचारांचा (Vitiligo Treatments). ह्या त्वचा रोगाच्या योग्य निदानासाठी आणि त्यानुसाऱ ह्या रोगावर योग्य असे उपचार करून घेण्यासाठी, तज्ञाचे मार्गदर्शन घेणे उत्तम. तुम्हाला जर vitiligo ची कारणे, त्वचेवरचे पांढरे डाग (white spots on skin), ह्या रोगाची इतर लक्षणे आणि कोडावरील उपचार ह्यांबद्दल कोणतेही प्रश्न असतील, तर पुण्यातील Clear Skin ह्या skin clinic ला नक्की भेट द्या. येथील अनुभवी त्वचारोग तज्ञ (dermatologists) तुम्हाला उत्तम सल्ला देतील, तुमच्या त्वचारोगाचे योग्य निदान करतील व तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरेल अशी उपचारपद्धती सुचवतील. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, तुम्हाला त्वचेचा मूळ रंग व सौंदर्य परत मिळवता येईल.
Further Reading
The Different Types of Dark Circles and How to Treat Them
Discover the different types of dark circles—pigmented, vascular, structural, and mixed—and expert treatments for brighter, healthier under-eye skin.
How to Remove Dark Circles Permanently?
Discover advanced dermatology solutions for dark circles at ClearSkin Clinic, Pune. Safe, effective, and customised for lasting results.
When to Start Anti-Ageing Skincare: Expert Advice ?
Find out the right age to begin anti-ageing skincare. Expert tips on routines, treatments, and dermatologist advice for youthful skin in Pune.
Difference Between Oxygen Facial and Hydrafacial
Some foods—including dairy, soy, high-GI and copper-rich items—might trigger melasma. Know what to limit for better skin tone.
Have thoughts? Please let us know
We are committed not only to treating you, but also educating you.