Dark Spots on Face – Removal Tips in Marathi

Written by Clear Skin Content Team | Medically Reviewed by Dr. Dhanraj Chavan on March 24, 2023
या लेखात आपण पाहणार आहोत चेहर्यावर काळे डाग पडण्याची कारणे व ते डाग काढण्यासाठीचे घरगुती उपाय.
चेहर्याची त्वचा हा प्रत्येकाच्या सौंदर्याचा एक महत्वाचा भाग असतो. चेहर्याची कांटी कांती नितळ, सतेज आणि तुकतुकीत असावी असे प्रत्येकालाच वाटते. त्यामुळे चेहर्यावर पडलेले काळे डाग कोणालाच नको असतात.
जरी ह्या डागांचा दुखणे आगर किंवा जळजळणे असा कोणताही त्रास होत नसला तरी ते चेहर्याच्या सौंदर्यात बाधा आणतात आणि म्हणूनच ज्यांच्या चेहर्यावर असे काळे डाग असतात ते त्यावरचे घरगुती उपाय अथवा औषधोपचार शोधतात.
या लेखात आपण पाहणार आहोत चेहर्यावर काळे डाग पडण्याची कारणे ( causes dark spots on face) व ते डाग काढण्यासाठीचे घरगुती उपाय. (Home remedies for removal of dark spots on face)
Table Of Content
- चेहर्यावरील काळे डाग पडण्याची कारणे
- चेहर्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी घरगुती उपाय
- निष्कर्ष
चेहर्यावरील काळे डाग पडण्याची कारणे
जेंव्हा आपली त्वचा प्रमाणापेक्षा आधिक मेलानिन (melanin) तयार करते, तेंव्हा हायपरपिगमेंटेशन (hyperpigmentation) म्हणजे त्वचेच्या रंगामधे बदल दिसू लागतो आणि ह्यामुळे त्वचेवर काळे डाग पडतात. तीव्र उन्हामुळे अथवा वाढत्या वयामुळे देखील चेहर्याच्या त्वचेवर काळे डाग पडू शकतात.
शरीरातील व्हीटामिन बी १२ च्या कमतरतेमुळेही हायपरपिगमेंटेशन होते, ज्यामुळे त्वचेवर काळे किंवा गडद रंगाचे डाग दिसू लागतात. हायपरपिगमेंटेशन चे अजून एक प्रमुख कारण म्हणजे हार्मोन्स चे असंतुलन. काही औषधांच्या दुष्परिणामांमुळे चेहर्यावर तसेच शरीराच्या इतरही भागांवर काळे डाग पडतात.
बर्याचदा, त्वचेवरील काळे डाग हे कोणत्याही उपचारांशीवाय निघून जातात परंतू अशा डागांचे नेमके कारण समजून घेणे आवश्यक आहे. त्वचेच्या कोणत्या आजारमुळे हे डाग पडत असतील तर त्या आजाराचे योग्य निदान होऊन त्यावरचे उपचार (treatment for dark spots on face) घेणे महत्वाचे ठरते.
तसेच, एखाद्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे अथवा हार्मोन्सच्या असंतुलनामुळे पडलेले डाग घालवण्यासाठी ती कमतरता भरून काढण्याच्या दृष्टीने आहार किंवा औषधे घेणे गरजेचे ठरते. त्यामुळे तज्ञाच्या मार्गदर्शनाशिवाय कोणतेही उपचार करणे योग्य नाही. तरीही, चेहर्यावरील काळे डाग घालवण्यासाठीचे तुलनेने सुरक्षित असे काही घरगुती उपाय पुढीलप्रमाणे.
तुम्ही जर चेहर्यावरील काळ्या डागांमुळे त्रास्त असाल तर हे नैसर्गिक उपचार (how to remove dark spots on face naturally) नक्की करून पहा.
चेहर्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी घरगुती उपाय
- चेहर्याला लिंबाचा रस आणि दही ह्यांचे मिश्रण लावल्याने चेहर्यावर पडलेले काळे डाग कमी होतात. लिंबाचा रस ब्लीचींग चे काम करतो ज्यामुळे त्वचेवरील काळेपणा कमी होतो. दहयामुळे त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते.
- चेहर्यावर ताक लावा, ते १५ ते २० मिनिटे ठेवा व गार पाण्याने चेहरा धुवा. असे केल्यास चेहर्यावरील मृत पेशी निघून जातात आणि त्वचेचा काळेपणा कमी होतो. ताकाप्रमाणेच साध्या दुधाचाही चेहर्यच्या त्वचेवर चांगला परिणाम होतो.
- हायपरपिगमेंटेशन रोकण्यासाठी हळड हळद अतिशय गुणकारी ठरते. चेहर्यावर हळदीचा लेप लावल्याने त्वचा उजळते तसेच तिच्यावरील काळे डाग कमी होतात.
- चहा पत्ती किंवा ग्रीन टी पाण्यात उकळून घेऊन त्याचा अर्क चेहर्याला लावल्यामुळे चेहर्याची त्वचा उजळते आणि काळे डाग निघून जातात.
- चेहर्याला आलो वेरा एलोवेरा लावल्यास त्वचेवरील काळे डाग कमी होतात तसेच आलो वेरा एलोवेरामुळे त्वचा मुलायम आणि टवटवीत राहण्यासही मदत होते.
- पपई मधील काही घटकांमुळे त्वचेचा काळेपणा कमी होतो. पपईचा गर चेहर्यावर नियमितपणे लावल्यास, चेहर्याची त्वचा उजळते.
- चेहर्याला मधाचा लेप लावल्यासाही त्वचेला झळाळी येते तसेच तिच्यावरील काळ्या किंवा गडद रंगाचे डाग निघून जाण्यास मदत होते.
- चेहर्यावरील काळे डाग घालवण्यासाठी ह्या निसर्गोपचारांबरोबरच, योग्य तो आहार घेणे, आणि नियमित व्यायाम करणे, तसेच, त्वचेची काळजी घेणे (skin care) आणि तीव्र उन्हापासून त्वचेला सुरक्षित ठेवणे खूप महत्वाचे आहे.
ह्या नैसर्गिक उपचारांममुळे अपाय नक्कीच होणार नाहीत परंतू आधी म्हटल्याप्रमाणे, प्रत्येकाच्या चेहर्यावरील काळ्या डागांचे कारण (cause of dark posts on face) वेगेळे असू शकते आणि त्याच्या त्वचेच्या प्रकारानुसार व त्या व्यक्तीचे वय, आहार, इतर आजार आशा सर्व गोष्टी लक्षात घेऊनच त्यावर योग्य उपचार होऊ शकतात.
शिवाय प्रत्येकवेळी घरेलू उपाय परिणामकारक ठरतीलच असे नाही. म्हणूनच, जर तुमच्या चेहर्यावर काळे डाग असतील तर त्याचे योग्य निदान करून घ्या आणि तज्ञाच्या सांगण्यानुसारच त्यावर उपचार करून घ्या.
तुम्हाला फार शोधाशोध करायची गरज नाही कारण Clear Skin मधील अनुभवी त्वचारोग तज्ञ तुम्हाला उत्तम मार्गदर्शन करू शकतील आणि तुमच्या त्वचेच्या विकाराचे योग्य निदान करून तुम्हाला गुणकारी ठरतीलअसे उपचार तुम्हाला देऊ शकतील. पुण्यात अनेक शाखा असणार्या ह्या skin clinic ला एकदा जरूर भेट द्या.
Do You Know?
Roughly 250 Patients Are Treated
Everyday By These Dermatologists
(You are one click away from flawless skin)
Meet Our Dermatologist!
निष्कर्ष
चेहर्यावरील काळे डाग घालवण्यासाठी विविध घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतात, पण प्रत्येकाच्या त्वचेची समस्या वेगळी असू शकते. घरगुती उपाय करताना, तज्ञाच्या सल्ल्यानेच उपचार करणे आवश्यक आहे.
योग्य आहार, व्यायाम, आणि त्वचेची काळजी घेणे हे देखील महत्वाचे आहे. जर घरगुती उपायांनी फरक पडत नसेल तर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे. पुण्यातील Clear Skin क्लिनिकमधील तज्ञ तुमच्या त्वचेच्या समस्यांचे योग्य निदान करून प्रभावी उपचार देऊ शकतात.
Further Reading
Does Pune’s Air Pollution Worsen Acne? Dermatologist Insights
Discover how Pune’s air pollution with PM2.5 levels 8.5x above safe limits worsens acne. Dr. Dhanraj Chavan shares dermatologist-approved protection strategies and treatment options.
Remove Black Dots on Nose Naturally | Skin Expert Tips
Learn how to remove black dots on your nose naturally. Explore effective home remedies and dermatologist tips for clear, smooth skin.
10 Effective Home Remedies to Remove Dark Spots on the Face Naturally
Do home remedies really remove dark spots on face? Understand what works, what doesn’t, and when to see a dermatologist for pigmentation.
12 Best Anti-Aging Foods for Youthful Skin
A dermatologist-approved guide to anti-aging foods for youthful skin. Learn how diet supports skin health and slows visible aging at ClearSkin Clinic.
Have thoughts? Please let us know
We are committed not only to treating you, but also educating you.








