fbpx इसब त्वचारोग (Eczema in Marathi): लक्षणे ,करणे व उपचार
Book Appointment

इसब त्वचारोग (Eczema in Marathi): लक्षणे ,करणे व उपचार

Jan 29, 2023

इसब त्वचारोग (Eczema in Marathi): लक्षणे ,करणे व उपचार

Table Of Contents

Worried about your skin condition? Get in touch with best of our skin specialists in Pune. For a skin treatment, book an appointment with our dermatologists near you +919584584111

इसब/Eczema  म्हणजे काय?

इसब ची लक्षणे व करणे (Eczema Symptoms and Causes in Marathi)

इसब त्वचारोग संसर्गजन्य आहे का?

एक्जिमा खाज सुटणे ताबडतोब कसे थांबवायचे?

इसब त्वचारोग वर उपचार  (Eczema Treatment in Marathi)

इसब/Eczema  म्हणजे काय?

इसब, म्हणजेच एक्झीमा हा एक असा त्वचारोग आहे, ज्यामधे, त्वचेच्या काही भागांवर सूज येते, खाज सुटते, आणि ते भाग खरखरीत होतात व त्यांना चिरा पडतात. काही जणांमध्ये, हा आजार, कोणत्याही उपायाशिवाय निघून जातो तर काहींना एक्झीमा साठी उपचार घ्यावे लागतात. ह्या लेखामद्धे आपण पाहणार आहोत, इसब ची कारणे, लक्षणे, व ह्या त्वचारोगावरील उपचार.

इसब ची लक्षणे व करणे (Eczema Symptoms and Causes in Marathi)

काही खाद्यपदार्थांमुळे, इसबची लक्षणे (symptoms of eczema) दिसतात. सुकामेव्यातील पदार्थ जसेकी काजू किंवा दुग्धजन्य पदार्थांमुळे एक्झीमा वाढू शकतो. धूर, पराग-कण, काही साबण, तसेच विशिष्ट वास, ह्या गोष्टींमुळे देखिल इसब ची लक्षणे दिसून येतात. इसब ची लक्षणे पुढीलप्रमाणे:

 • विशिष्ट साबण, शांपू तसेच काही खाद्यपदार्थांच्या सेवनामुळे इसब होऊ शकतो.
 • काही allergens जसेकी पराग कण, बुरशी, किंवा प्राण्यांचे केस, आशा गोष्टी देखील इसब होण्यास कारणीभूत ठरतात.
 • काही जंतू व विषाणूंमुळे इसब होऊ शकतो, ह्यात bacteria, virus व fungi चा समावेष आहे.
 • तीव्र तापमानामुळे ही इसब होतो. तीव्र उष्णता, तीव्र थंडी किंवा हवेतील आर्द्रता ह्यांमुळे देखील एक्झीमा ची लक्षणे वाढतात.
 • मानसिक ताणामुळे इसब ची लक्षणे वाढू शकतात.
 • होर्मोन्स मधील असंतुलनामुळेही एक्झीमा ची लक्षणे वाढतात. 

इसब त्वचारोगाची लक्षणे, त्याच्या तीव्रतेनुसाऱ बदलतात, तसेच, वयानुसारही ह्या आजाराची लक्षणे वेगळी असतात. बहुतेक वेळा, इसबमुळे त्वचा कोरडी पडते व तिच्यावर खवले दिसू शकतात. त्वचेला खाज सुटते, तसेच जखमा होतात. सतत खाजवल्यामुळे, आणि त्वचेला घर्षण झाल्यामुळे, इतर काही skin infections उद्भवू शकतात. एक्झीमा मुळे त्वचेवर rash किंवा पुरळ येते, जे काहींमध्ये राखाडी किंवा तपकिरी रंगाचे दिसते, तर काहींच्या त्वचेवर एक्झीमा मुळे डाग किंवा चट्टे पडतात.

अगदी लहान बाळांमध्ये दिसून येणारी एक्झीमा ची लक्षणे पुढीलप्रमाणे (signs of eczema in infants):

 • डोक्यावरील त्वचेवर व गालावर पुरळ येते.
 • काहीवेळा, ह्या फोडांमधून द्रव स्त्रवतो
 • पुरळ असलेल्या त्वचेला खूप खाज सुटते.

मोठया मुलांमध्ये आढळणारी एक्झीमाची लक्षणे पुढीलप्रमाणे (symptoms of eczema in children):

 • गुढगे व कोपरांच्या खोबण्यांमध्ये पुरळ उठते, तसेच पायावर, मानेवर व मनगटांवर पुरळ येते.
 • काही जणांमध्ये फोडांसारखे पुरळ येते.
 • काही वेळा पुरळाचा रंग बदलतो.
 • काही जणांमध्ये त्वचा जाड होते.

प्रौढ व्यक्तींमध्ये दिसून येणारी एसब त्वचारोगाची लक्षणे खालीलप्रमाणे (eczema symptoms in adults):

 • पुरळाबरोबर त्वचेवर अधिक खवले दिसतात.
 • गुढगे व कोपरांच्या खोबण्यांमध्ये पुरळ उठते.
 • संपूर्ण शरीरावर पुरळ येते.
 • त्वचा कोरडी पडते आणि खूप खाज सुटते.

इसब त्वचारोग संसर्गजन्य आहे का?

नाही, इसब हा त्वचारोग संसर्गजन्य नाही.

एक्जिमा खाज सुटणे ताबडतोब कसे थांबवायचे?

कोमट पाण्याने अंघोळ करणे, तसेच सौम्य साबणाचा वापर करणे, रोज moisturizer चा वापर करणे, त्वचेला खाजवणे किंवा घर्षण टाळणे, व सूती कपड्यांचा वापर करणे, ह्यांसारख्या घरगुती उपायाममुळे, एक्झीमाची लक्षणे तसेच त्यामुळे होणारा त्रास कमी करता येतो. इसब त्वचारोग घरगुती उपाय (eczema home remedies in Marathi) पुढीलप्रमाणे:

 • कोमट पाण्याने अंघोळ करणे
 • अंघोळीपूर्वी Moisturizer चा वापर करणे
 • मऊ सूती कपड्यांचा वापर करणे
 • अचानक होणार्‍या हवेतील व तापमानातील बदलांपासून त्वचेला सुरक्षित ठेवणे. 
 • नखे कापलेली असणे जेणेकरून, खाजवण्यामुळे त्वचेला होणारा त्रास टाळता येईल.

इसब त्वचारोग वर उपचार  (Eczema Treatment in Marathi)

 • कोर्टिकोस्टेरोइड (corticosteroid) क्रीम्स लावल्यास, त्वचेची खाज व सूज कमी होते.
 • सिस्टेमिक कोर्टिकोस्टेरोइड (systemic corticosteroids) व इम्युनोसप्रेसंट (immunosuppressants), औषधे व injections च्या स्वरुपात घेता येतात. ह्याममुळे देखील इसबची लक्षणे कमी होतात.
 • जर इसब बरोबर बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, तर antibiotics हा एक्झीमा वरचा चांगला उपाय ठरतात.
 • फोटोथेरपी, ज्यामधे त्वचेवर UVA व UVB किरण सोडले जातात, ह्या उपचार पद्धतीचाही इसब वर चांगला परिणाम होतो.
 • रोगप्रतिकार प्रणाली वर परिणाम करणारी काही औषधे आहेत, ज्यांयोगे देखील इसब वर उपचार केले जातात.
 • कोणतेही औषध घेण्यापूर्वी किंवा उपचारपद्धती अवलंबण्यापूर्वी तज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

तर अशा प्रकारे, आपण पाहिले की इसब म्हणजेच एक्झीमा हा त्वचारोग कशामुळे होतो, त्याची लक्षणे कोणती व त्याच्यावरील उपाय व उपचार कोणते. वर म्हटल्याप्रमाणे, एखाद्या चांगल्या Dermatologist ला भेटूनच ह्या किंवा कोणत्याही त्वचारोगाचे योग्य निदान करून घ्यावे व तज्ञाच्या सल्ल्यानेच त्यावर उपचार करून घ्यावेत. तुम्ही जर इसब किंवा इतर कोणत्याही त्वचारोगावर उपचार घेण्यासाठी एखाद्या अनुभवी dermatologist च्या शोधात असाल, तर Clear Skin ह्या पुण्यातील skin clinic ला आवश्य भेट द्या. तेथील तज्ञ doctors तुम्हाला उत्तम मार्गदर्शन करतील. त्यांच्या मदतीने तुम्हाला पुन्हा एकदा सुंदर आणि तुकतुकीत कांती परत मिळवता येईल.

For treating your skin condition, feel free to get in touch with one of our best dermatologists in Pune. You can also call on +919584584111 to book an appointment at one of our skin clinics near you.

Share:

Dr Dhanraj Chavan

About the Author: Dr Dhanraj Chavan

Dr. Dhanraj Chavan is a globally trained, young, and dynamic dermatologist. He is a Consultant Dermatologist and Varicose Vein Specialist at Clear Skin, VeinMD, and HairMD.

Previous Post

event-img

कोड रोग (Vitiligo) : लक्षण, कारणे व उपचार

Blog, Eczema|Dr Dhanraj Chavan|
January 29, 2023

कोड रोग, म्हणजेच vitiligo मध्ये त्वचेचा रंग जातो, ज्यामुळे, त्वचेवर पांढरे डाग दिसतात किंवा त्वचा पूर्णपणे पांढरी होते. ज्या पेशी त्वचेला रंग असण्यास कारणीभूत असतात, त्या गेल्यामुळे किंवा त्यांचे कार्य... 51074

Next Post

event-img

Skin Darkening Due to Water Change

Blog, Eczema|Dr Dhanraj Chavan|
January 29, 2023

Has a sudden water change caused your skin to darken? Don’t worry, as you aren’t alone! Skin darkening due to water change is a common condition. While in some cases,...

Leave a Comment

Your email id will not be published.Required fields are marked*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *